आमुचा येशू ख्रिस्त भगवान

मराठी

आमुचा येशू ख्रिस्त भगवान पाप जगाचें घेऊनि शिरीं अर्पुनी प्राणा जगतां तारी धन्य प्रभु येशू ! तनुधारी देवाचा गुणवान जगतासाठीं स्तंभी चढला पाप जगाचें घेऊनी गेला मरणावरतीं विजयी झाला कोण असा बलवान पाषाणाच्या ठिकर्‍या झाल्या चहुंबाजूंनी विजा चमकल्या भूमि हादरुनी थंडीं उघडलीं कडकडलें अस्मान दु:खाची ही कथा संपली तिसर्‍या दिवशीं पहांट झाली सृष्टी आनंदानें फुलली झालें पुनरुत्थान