अविनाशी सुख तें मज पामराला ।

मराठी

अविनाशी सुख तें मज पामराला । प्रभु देइ, तर शोक करू मी कशाला स्वर्गी नसे दु:ख, मरणाचि वार्ता, परि प्रीति, सुख, शांति प्रभूची मनाला तेथे तहान, भूक लागे न कांही, परि पीति प्रभु ह्याच संजीवनाला प्रिय पाडसे सारि जी नेलि त्याने ती सर्व सुखरूप देईल माला प्रभु हस्त पसरोनि सद्भक्त येतां धावून मिठि मारि त्यांच्या गळ्याला प्रेमे ऐकति भक्त ती मधुर वाणी, आहा कसे वर्णु प्रभुदर्शनाला. सद्भक्त, गणदूत गाती आनंदे न्याहाळिता प्रीय प्रभूच्या मुखाला सद्भक्त मुकुटाते काढुनि गाती, जयजय, सुवंदित, नवगीत त्याला प्रभु भक्त कवळोनि हृदयासि धरिता आहा नसे पार मग त्या सुखाला