अहो स्तुति गा

मराठी

अहो स्तुति गा देवाची दया वर्णा, आम्हांला तो संभाळीतो, अहो स्तुति गा ! पुत्राला नाही राखींले, आम्हां ताराया धाडिलें, सत्प्रेमा दाविलें, अहो स्तुति गा ! अहो वंदा नाम ख्रिस्ताचीं प्रीति वर्णा, पाप्यांना तो उद्धारीतो, वंदा येशूनाम ! तो वधस्तंभीं मारीला, पाप्यांचा दंड भरीलां उद्धार साधिला, वंदा येशू नाम अहो पापी, या पवित्र आत्मा मागा, मनाला तो सुधारीतो, अहो पापी, या ईश्वर कृपा दाखवी, येशू प्रेमानें बोलावी, सदात्मा सुचवी, अहो पापी, या