अहो भक्त, या,

मराठी

अहो भक्त, या, भजा देवाला आतां तो कृपावान, सामर्थ्यवान् अहो भक्त, या करा बापाची प्रार्थना, वर्ण प्रभूची करुणा, मागा सत्प्रेरणा, अहो भक्त, या अहो पापी, या, नमा देवाला आतां तो नीतीवान व दयावान अहो पापी, या तो आजी कृपा दावीतो, प्रभूही आतांपावेतो, प्रेमे बोलावितो, अहो पापी, या अहो सर्व, या, आर देवाची भक्ती, तो सत्यवान व प्रीतीवान, अहो सर्व या आयुष्य वेगे गुजरेल, न्यायाचा काल पोहंचेल तो पापी घाबरेल अहो सर्व, या