ईश्वराची दया किती !

मराठी

ईश्वराची दया किती ! थांग तिचा लागेना न्यायि, तरी त्याची प्रीती सिंधुएवढीं जाणा देव बोले प्रेमें फार टाकिं माझ्यावरी भार टाकिं माझ्यावरी भार सर्व कष्टी, सर्व दु:खी ओझियांनी कण्हती ऐकुं जातें दिव्यलोकीं, प्रीती तेथें वसतीं देव खरा ममताळू, अंत कांहीं लागेना केवढा तो कनवाळू माणसांना कळेना ती खरी अगाध प्रीती जी तयाच्या अंतरीं, तोच म्हणे, नाहीं भीती, मी दयासनावरी या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकूनी, निश्चला ती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी बापावरी टेंकतांना लेकरांना सुख फार, येशूपाशी राहतांना हर्ष वाटतो अपार