उद्धार घेऊनीयां

मराठी

उद्धार घेऊनीयां ये प्रभू देवळीं तैं बाळे येऊनीया स्तवाया लागली ती गर्जति, होसान्ना भेटति प्रभुला, त्या त्यांच्या रम्य गाना प्रभूही लोभला आता तो तेजवंत स्वर्गात राहतो, मुलांना तो अत्यंत सुप्रीय मानितो आम्ही लागूनी पायां येशूला देउं मान, त्या नाम वंदायाला प्रेमाने अर्पू प्राण केवळ बोलण्यानें होती न स्तवने, संपूर्ण हृदयाने करूच वंदने जरी आम्हांकडूनी वंदने न होतील, धोंडे हे ओरडूनी प्रभूला वंदीतील