उपास पुन: हा आला

मराठी

उपास पुन: हा आला याजक मंडळी दावोत अनुतापाला येऊनी देवळी बाह्य शोक, उपासना, कर्मकांड वृथा खिन्न, व्यग्र मनाविना शीण, दांभिकता ऊर बडविणे, किंवा राख घेणे माथी, भग्न हृदाविणा जीवा व्यर्थ शोष, भ्रांती म्हणूनी, देवा आळवू क्रोध हा निवारी, दंडही तया विनवू कृपे दुरी सारी शरणांगतांसी बापा, अभय तू देई, वेळ देई पश्चात्तापा, चेचले ते त्राही धन्य त्र्येका, मान्य व्हावा उपास हा तुला, उचीत तो व्हावा देवा, स्वर्गी प्रतिफला