उषा जैं नटती

मराठी

उषा जैं नटती प्राण उद्धारतीं स्तुतास्तु येशू ख्रिस्त, प्रार्थनीं वा श्रमीं म्हणें येशूस मी स्तुतास्तु येशू ख्रिस्त प्रार्थनामंदिरीं घंटा नाद करी स्तुतास्तु येशू ख्रिस्त नाद तो घुमतो हर्षे सुचवितो स्तुतास्तु येशू ख्रिस्त तूं गायकांसवें गाई नित्य जिव्हे स्तुतास्तु येशू ख्रिस्त गाणें हेंचि टिके न पडतां फिकें स्तुतास्तु येशू ख्रिस्त जैं निद्रा न येई, मूक जीव गाई स्तुतास्तु येशू ख्रिस्त या मंत्रें मी वारीं कुकल्पना सारीं, स्तुतास्तु येशू ख्रिस्त खिन्न जरी मनीं शांति या गायनीं स्तुतास्तु येशू ख्रिस्त जैं जगा विटतो तैं गाऊं लागतों स्तुतास्तु येशू ख्रिस्त रात्र दिन होई भावें जैं मी गाई स्तुतास्तु येशू ख्रिस्त भीती निशासत्ता स्तोत्र हें ऐकतां स्तुतास्तु येशू ख्रिस्त स्वर्गी मधुरसें गाणें अन्य नसें स्तुतास्तु येशू ख्रिस्त जलीं, स्थलीं ध्वनी चढे हा गगनीं स्तुतास्तु येशू ख्रिस्त जोंवरी जीवें मी तों गावें नेहमीं स्तुतास्तु येशू ख्रिस्त स्तोत्र युगोयुगीं हेंचि चढो स्वर्गी स्तुतास्तु येशू ख्रिस्त