ऊठ, ऊठ, माझ्या जिवा,

मराठी

ऊठ, ऊठ, माझ्या जिवा, वंदुनि दिनरजनीच्या धवा, आयुर्मार्गी आक्रम नवा, कर गौरावा देवाच्या रजनी रमली प्रभुचिंतनीं, रमला दिन हा प्रभुसेवनीं, रमलीं उभयें त्याच्या चरणीं, तुज घेउनी संगातें ! जें जें येइल पुढतीं अतां ख्रिस्तार्पण ते हो बोलतां, भाव ठेवुनी, जीवा पुरता, चरणांवरतीं येशूच्या येशू ऐसा मित्र न कुणी, पाही अवघे जग धुंडुनी नेईल तुज सांभाळुनी, जा मागुनी तूं त्याच्या करील तारण, संगोपन, शिक्षण तव श्रमनोदन, ग्लानी येतां संजीवन, संबोधन भ्रमतांना ! साधक येशू, तूं साधन, तयास अवघें साध्य‍ज्ञान करुनी आपलें समर्पण, क्रम हा दिन तत्संगें