एक तुझा हस्त, निवारी आजार

मराठी

एक तुझा हस्त, निवारी आजार आम्हां करी पार, मृत्युंतून किती कष्टी रोगी, बरे तुवां केले बहिरे हर्षले, तुझ्या हस्तें पंगु आणि लुळे, तुझीं गीतें गातीं लंगडे चालती, तुझ्या हस्तें आनदें नाचत, कुष्ठरोगी गेले विकार नाशिले, तुझ्या हस्तें तुझी गोड वाणी, हर्षवी जगातें अशक्‍तता जाते, तुझ्या हस्तें तव भक्‍तां लाभें, आरोग्य जीवन देणारा तारण, तुझा हस्त