एकचि खरा शुद्ध यज्ञ तो,

मराठी

एकचि खरा शुद्ध यज्ञ तो, बापा, दृष्टीत पूर्ण तूझीया येथे पहा समोर मांडीतो मध्यस्थासह विधीमध्ये या- प्रार्थीतो उध्दारप्रेमा स्मरी- दावील जो तू काल्वरीवरी स्वपुत्रमुखी आमुची देवा, प्रतिबिंबीत पाही तू सारी मुळी न घडली तुझी सेवा भक्ती शिथील, श्रद्धा भिकारी तद्‍दु:ख लक्षुनी क्षमा करी, आम्हांस्तव ते भोगीले, स्मरी समक्ष येथे तुझिया पदी, प्रिय जनार्थ आम्ही प्रार्थीतो, घरी तयांसी सन्निध हृदी, कलंक क्षालुनी पापाचा तो शक्ती दे तया शुद्ध राहाया, मुख्यत्त्वे देई दान टिकाया आम्हाही प्रेमे तू पदी ओढी, कृपाळू तारका, क्षमाशीला अन्नाचि या तू लावूनी गोडी प्रक्षाली कालिमा हे दयाळा संतोषे घडू दे नित्य सेवा, तीतचि पावो जीव विसावा