ऐका ! दूत स्तविती

मराठी

ऐका ! दूत स्तविती ख्रिस्त राजा वंदिती, शांति झाली भूवनां जनांवरी करुणा गाहो राष्ट्रें सगळीं, दिव्य दूत मंडळी ख्रिस्त राजा आपला बेथ्लेहेमी जन्मला, ऐका दूत स्तविती, ख्रिस्त राजा वंदिती ख्रिस्त राजा अति थोर कोण श्रेष्ठ त्यासमोर दिव्य व्यक्‍ति ईश्वरी कुमारीच्या उदरीं अवतार घेऊनी, शरीर तो धरुनी जग केलें वस्तिस्थल ठरे तो इम्मानुएल धन्य राजा शांतीचा वंद्य भानु नेकीचा जीवज्योत पुरवी, मुक्‍तिमार्ग कळवीं नम्रपणा धरिला क्षेम द्याया तो आला मानवाला उंचवी नवा जन्म घडवी