ऐश्वर्ये स्वारी चालूं दे !

मराठी

ऐश्वर्ये स्वारी चालूं दे ! ईब्री होसान्ना गाती ते ! हे लिन त्रात्या मार्गावर ! डहाळ्या वस्त्रें यांचा थर ! ऐश्वर्ये स्वारी चालूं दे ! तूं पावशील मृत्युतें ! आरंभे ख्रिस्ता जयोत्सव, मृत्यु पापांचा पराभव ऐश्वर्ये स्वारी चालूं दे ! गाताति दूत संगीतें होणारा यज्ञ पाहायास, माना वांकविति उदास ! ऐश्वर्ये स्वारी चालूं दे ! समीप अंत्य युद्ध तें ! पिता, सिंहासनावरी प्रतिक्षा तुझी कीं करी ऐश्वर्ये स्वारी चालूं दे ! पावाया चाल मृत्युतें ! हे देवा मृत्यु साहूनी आरुढ हो सिंहासनीं