कशाला अतां मोह ? पापें कशाला ?

मराठी

कशाला अतां मोह ? पापें कशाला ? कशाला, अतां क्लेश चिंता कशाला ? पुढें माझिया मार्ग मी अन्य पाहें, शरीरीं तुझें रक्त खेळोनि राहें ! जगा येउं दे घेउनी वागुरांना, बघूं दे जगाच्या प्रमत्तां गुरांना, मला जिंकणे साध्य कोणास नोहे ? शरीरीं तुझें रक्त खेळोनि राहें ! करो कोणि निंदा, धरो मत्सरातें, न माझें अशाशीं कशाशींच नातें, तुझ्यावांचुनी शून्य सारे मला हे शरीरीं तुझें रक्त खेळोनि राहें ! वधस्तंभ मीं घेतला स्कंधदेशीं, खोळोनी तया घेतलें आपणाशीं, पुन्हा ऊठला ख्रिस्त, तो मीच आहें शरीरीं तुझें रक्त खेळोनि राहें ! जिथें मी तिथें तूं सदा व्यापलेला, असा प्राशिला मी, प्रभो, आज पेला ! मनीं स्वर्ग, माझ्यापुढें स्वर्गता हे शरीरीं तुझे रक्त खेळोनि राहे !