कष्टी, श्रमी भागलेल्या,

मराठी

कष्टी, श्रमी भागलेल्या, दीन मानवा, ख्रिस्तद्वारें मिळें तूला विसांवा कैसा मी ओळखूं त्यासी शरण जाया ? हातीं पायीं कुशीं पाहीं खुणा त्या आहे मस्तकीं मुगुट शोभा द्यावया ? कांट्यांचा मिळाला मात्र घालाया मीं सोडीलें नाहीं त्यासी, काय शेवटी ? कष्ट जातां सदा होई विश्रांती मज शरणागताला तो धिक्कारणार ? ऐसे नाहींच कल्पांतीं घडणार अंतीं तीं सत्सौख्यें खरीं ख्रिस्त देई काय ? देई, तारलेले गाती, जयजय