काल्वरीवरी चला, येशू क्रूसिं खीळिला !

मराठी

काल्वरीवरी चला, येशू क्रूसिं खीळिला ! या रडूं ढळांढळां, येशु क्रूसिं खीळिला क्लेश यातना किती, देह मानसाप्रती ! पापभार वाहिला, येशु क्रूसिं खीळिला हातिं पायिं ठोकिले, निर्दयें कसे खिळे रक्‍तओघ चालला, येशु क्रूसिं खीळिला ताज कंटकी शिरीं, बोरु दंडसा करी बहु परीहि हिणविला, येशु क्रूसिं खीळिला चोर दोन बाजुंसी, साथ द्यावया क्रूसीं गुन्हेगार लेखिला, येशु क्रूसिं खीळिला शिष्यनाम जो वरी, घात कां असा करी सद्रुरुहि वोपिला, येशु क्रूसिं खीळिला जे त्रिवर्ष सोबतीं, अजि कसे न संगतीं ? दु:खि, कष्टि एकला, येशु क्रूसिं खीळिला ज्यास अपुले गणी, सर्व दु:ख कारणीं हात देति आपुला, येशु क्रूसिं खीळिला येशु दु:ख मस्करीं, ना घडे असें करी दे प्रसाद हा मला, येशु क्रूसिं खीळिला