कोंकर्‍याचा सण आला,

मराठी

कोंकर्‍याचा सण आला, शुभ्र वस्त्रें लेऊं चला ख्रिस्ताचें गाऊं उपकार, आलों तांबड्या सिंधुपार क्रूसरुपी वेदीवरी स्वदेहें खंड तो भरी तद्रक्‍त जो जीव चाखी, राही देवाठायीं सुखी विनाशदूत वारुनी, पास्खरात्रीं सांभाळुनी, फारोच्या जुलुमांतूनी स्वप्रजा नेली काढूनी वल्हांडणाचा कोंकरा, वधिला ख्रिस्त हा खरा तनु जी अर्पिली, खरी खमिरावीण भाकरी पर्याप्त पूर्ण यज्ञ हा ख्रिस्ता मृत्युंजया महा, दास आपुले जिंकूनी, तूं दान दिलें जीवनी मृतांतूनी जो उठला, तया त्रात्या गाऊं चला शत्रु हाणूनी जिंकिला, पारादैस आम्हां दिला स्तवा तुम्ही मृत्युहंता, पुत्रा हो पुनरुत्थिता, पित्या आत्म्या अर्पा स्तुती, युगानुयुगीं, संप्रती