क्रूसापुढें ध्यातां मला

मराठी

क्रूसापुढें ध्यातां मला क्षण मधु गमती, तेथें मीळे पतिताला शांति, शक्‍ति जीवितीं त्यावरी ओघ मी पाही रक्‍ताचा कृपामयी, पाप्यां मिळे त्या प्रवाहीं क्षमा दान अक्षय्यी पांग फिटले या स्थानीं माझें, क्रुसाचे पायीं, नेत्रीं जरीं दिसे ज्लानी, माझी दया त्यां ठायीं प्रभो, मुख हें वैभवीं मी पाहीन तोंवरी, मग्न तव ध्यानीं ठेवीं मजला निरंतरी