ख्रिस्त उठला फिरुनी,

मराठी

ख्रिस्त उठला फिरुनी, सांगा जा हो सर्वांना, आला बंधनें तोडूनी, गे पृथ्वी गाई गाना, त्यानें मृत्यु जिंकिला, जनोद्धार साधीला याहो, भीतीग्रस्त, खिन्न, उपवास पाळीले, हास्य करा, व्हा प्रसन्न, दु:ख पूर्ण भोगीलें, प्रायश्चित्त, यातना, पाप ना छळी पुन्हां सान थोर गा आनंदें, ख्रिस्ता वीरा विक्रांता, रात्र, दु:ख तत्प्रसादें, पार संपली आतां, पूर्व पाहा शोभली सिद्ध ती सणा झाली