ख्रिस्त पुन्हा उठला,

मराठी

ख्रिस्त पुन्हा उठला, त्यानें मृत्यु जिंकिला ऐका ! दूत स्तविती, स्वर्गी सर्वदा गाती हालेलूया ! ज्यानें केलें प्राणार्पण, केलें दु:खही सहन, त्या पास्खाच्या कोंकरा हर्षे गा परात्परा हालेलूया ! साही क्रूसी कष्ट फार, मित्रहीन, निराधार वैभवी, जीवंत तो आम्हांसाठी प्रार्थितो हालेलूया ! जो गर्तेत निजला, तो वैभव पावला, झाला राजांचा राजा गाती हें ख्रिस्ती प्रजा, हालेलूया ! नष्ट कैसें तरती, क्षमा कैसें पावती, कैसें जाती वैभवी हें आम्हां तो शिकवी हालेलूया ! पास्खकोंकरा दयाळा तारिलेल्यां प्रेमें पाळ, पापदोषा घालवीं नित्य हर्ष दाखवीं हालेलूया !