१ धांवत आली बघ रजनी,

मराठी

१ धांवत आली बघ रजनी, ध्यांत जगा टाकित भरुनी धांवत ये तूं झणिं सदया, ये प्रभु, मजसह राहाया ! २ साह्य न कोणी जगिं उरला, एक सुखाचा रज नुरला, ज्यास तयाच्या प्रिय सखया, ये, प्रभु, मजसह राहाया ! ३ ह्या जगतींची मम वसती, स्वप्नच सौख्यें, विभवततीं, स्थैर्य न काडीभर जगता, एक अढळ जगिं तूं, ख्रिस्ता! ४ बंधु सखा तूं जवळ तरी दुर्बल माझे सकल अरी अश्रु कशाचे ? भय कसलें? दीन मरण मरुनीं गेलें ! ५ मी तवसंगें जगदवना, झांकिन अंतीं मम नयना रात्र सरोनी दिनसमया, पाहिन ! धर हृदिं दीना या