ख्रिस्त माझा तो सर्वांचा

मराठी

ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमा त्याला तोचि आपुला तारणारा या स्तवा त्याला तो जगाचा त्राता, पालक मालक या विश्वाचा क्रुसावरती अर्पूणी प्राणा उठला तारायाला तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा अदभुत, मंत्री, देव समर्थ पिता सनातन आमुचा ख्रिस्त दाता शांतिप्रीतीचा अविरत आनंदाचा एकच वैद्द्य जगती याची दैवी आरोग्याचा त्याचे व्हावे मनी जयाच्या स्वीकाराहो त्याला जगदुद्धारक, जीवन, सत्य आळवा नित्य तयाला