ख्रिस्त माझा राहे जेथें

मराठी

ख्रिस्त माझा राहे जेथें तेंच माझें मंदीर, नित्य सेवावे ख्रिस्तातें हाच माझा संसार ख्रिस्त माझें, ख्रिस्त माझें, ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त ज्यांचा बंधु ते ते आप्त माझे जीवाचे, सेविती जे प्रेमें त्यातें पाय सेवीं मी त्यांचे मान माझा, माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती, सौख्य सारें ख्रिस्ती भक्ती, संग त्याची सच्छांती ख्रिस्त येथें किंवा तेथें, आज उद्यां कल्पांतीं व्यापि विश्वातें, कालातें, राहि माझ्याही चित्तीं