ख्रिस्त स्त्वा खालीं वरीं,

मराठी

ख्रिस्त स्त्वा खालीं वरीं, नमा हो त्यासमोर, मुगुट घाला त्यावरी, तो धन्य, राजा थोर भक्तांनो, कृपा गाजवा, भरीला दंड घोर सर्वत्र कीर्ती वाढवा, तो धन्य, राजा थोर पाप्यांनो, धरा त्याचे पाय, त्यजुनी पापें घोर, भिडूनी त्यासीं फळ काय तो धन्य, राजा थोर प्राणिमात्रांनो, सत्वरीं, नमा हो त्यासमोर, मुगुट घाला त्यावरी, तो धन्य, राजा थोर