ख्रिस्ता, अर्पितों तुला

मराठी

ख्रिस्ता, अर्पितों तुला हा जो दिन तूं दिला त्याचा गुप्त परिणाम लावी घ्याया तव नाम होऊं नये हानि, त्रास, क्रूस छाप मारी त्यास जरी सुख त्याकडून हो तूं प्रिय सर्वाहून जरी त्यांत झालें दु:ख, तें तुझ्या प्रसादें सुख प्रार्थू असतां सकाळ, आज अम्हां तूं संभाळ अम्ही शक्तिविरहित शत्रूंमुळें भयभीत याचें तुला पूर्ण ज्ञान येणें आहों भाग्यवान तुझी दया आठवून शक्ति मागतों वरुन शास्त्र बोध ठसवी, अनुग्रह पुरवी, तुला द्याया आपणांस वश करिं तूं आम्हांस, साधवि स्वमनोदय आम्हां वागवी अक्षय प्रभो ऐक तूं सत्वर, प्रेमें देई मुख्य वर, एकनिष्ठा मागतों, मुख्य हीचि चाहतो, अशा दानें मौल्यवन नित्य करुं तव मान