ख्रिस्ताचि थोर प्रीति

मराठी

ख्रिस्ताचि थोर प्रीति सांगेन तुजला, तो दीन झाला किती, तो केविं वर्तला सांगेन की ती साची, ती गोड वर्णाया ही गोष्ट तारणाची बिचारे पापियां ही ख्रिस्तप्रीति गावी, सर्वांस कळवावी, स्वर्गातही वर्णावी, हे फार आवडे ख्रिस्ताचि थोर प्रीती अपूर्व ती अपार, गाईन त्याची स्तुती, कधी न राहणार मला अशा पाप्याला ख्रिस्ताने शोधीले, किती हो कळवळा अशास तारिले ख्रिस्ताचि थोर प्रीती सांगेन सर्वा ती, ती हर्ष देते मला, रसीक वाटे ती आहां बहुतेकांला ही नाहिं कळली, सांगावि त्यां, ही मला उत्कंठा लागली ख्रिस्ताचि थोर प्रीती जयांस कळलीते पुन्हा इच्छीताती ऐकाया सगळी स्वर्गात गाऊं आम्ही नवीन गायनें, होतील तीं नेहमीं ख्रिस्ताचि स्तवनें