ख्रिस्ती हर्षोत सारे

मराठी

ख्रिस्ती हर्षोत सारे जिवें, मनें व स्वरें वृत्त, सावधानचित्त ऐका जन्म घेई आज ख्रिस्त, गाढवें व बैल तीं गव्हाणीं ईश वंदिती आजि जन्में ख्रिस्त ख्रिस्ती हर्षोत सारे ! जिवें, मनें व स्वरें धन्यतेसि नाहीं पर ! धन्य ! हाचि ख्रिस्त-जन्म सार, स्वर्ग होई मुक्‍तद्वार, कदापि नाहीं झांकणार हाचि जन्म सार ख्रिस्ती हर्षोत सारे ! जिवें, मनें व स्वरें जाई मृत्यु भय तें ! शांति ! ख्रिस्त जन्मे तारण्या, स्वर्गृहास वैभवी, सान थोर बोलावी, ख्रिस्त तारण्या !