चला सिद्ध व्हा, या समरा !

मराठी

चला सिद्ध व्हा, या समरा ! जयघोष करा, जयघोष करा करा त्वरा रे, करा त्वरा, जयघोष करा, जयघोष करा ! ढाल करीं घ्या विश्वासाची, कट्यार घ्यारे प्रभुवचनाची, खरेपणें बांधा कमरा, जयघोष करा, जयघोष करा ! उरस्त्राण नीतीचें घाला, चढवा तारण ह्या टोपाला, प्रभुप्रीतीचा ध्वज उभारा, जयघोष करा, जयघोष करा ! मोहपाप, दु:खादिक शस्त्रां मोडा, तोडा या मरणास्त्रां पराभूत सैतान करा जयघोष करा, जयघोष करा ! ख्रिस्तपदांवर आणून घाला दुरावलेल्या नरनारींला, वसुंधरासंताप हरा, जयघोष करा, जयघोष करा ! प्रसंग पडला जाणुन बांका, दिवस असे तो झुंजा, जिंका ! प्रभु अपुला तरि विजय खरा, जयघोष करा, जयघोष करा ! हृदयीं, इकडें, तिकडे, पुढतीं, मागें, खालीं, किंवा वरतीं, ख्रिस्त उभा हा भाव धरा, जयघोष करा, जयघोष करा