चित्त कापे, ऐक वाणी

मराठी

चित्त कापे, ऐक वाणी म्हणे, ख्रिस्त जवळी, दिनी योग्य कर्मे करा, सोडा अंधारातली. जागृतीशब्दे या उठो जीव मग्न जो भवी, आळस देवो टाकूनी, उदेला ख्रिस्तरवी प्रतीक्षीत कोकरा हा येई क्षमा घेऊनी, साधू या, ती त्वरे सारे, पश्चात्तापा करूनी अंती तोची पुन्हा येतो जगत्‌ भेणे कांपणार, परी भक्तां देईल तो पिता, पुत्र यांसी असो संस्तुती, पूजा, सन्मान तैसे अनादी आत्म्याही जगत्‌ वंदो त्यासमान