चेतिव आम्हां दीनां,

मराठी

चेतिव आम्हां दीनां, पवित्र आत्म्या येउनी हिमवत अमुचीं अंत:करणें थंडचि गेली होउनी ऐहिक लोभें आत्मसुखाची भुरळचि गेली पडुनी मोहक किती तरी श्रमवी हृदया अपुल्या पाशें छळुनी पारव्यासम तूं अससि स्नेहाळू, मनिं वस आत्म्या म्हणुनी