१ जेव्हां बेथ्लेम नगरीं,

मराठी

१ जेव्हां बेथ्लेम नगरीं, ख्रिस्त जन्मे मार्योदरीं गाती दूत हर्षभरीं, परमोच्चीं देव स्तुत २ मेंढक्यां ती प्रगटली सांगण्या दूत मंडळी, देव जन्माला भूतलीं परमोच्चीं देव स्तुत ३ राजा जन्मे शास्त्रानुसार, करावया मानवोद्धार, म्हणूनी गातो हर्षे फार परमोच्चीं देव स्तुत ४ तरी प्रिय प्रभो, दे दान, स्वर्गी नित्य-दर्शन-मान, जैं तुजला हें गाऊं गान परमोच्चीं देव स्तुत