१ ज्या क्रूसीं ख्रिस्त मेला, जाण,

मराठी

१ ज्या क्रूसीं ख्रिस्त मेला, जाण, जै त्याकडे निहाळतों तैं मी धिक्कारीं अभिमान, सुलाभ हानि मोजितों २ ख्रिस्ताचा क्रुस यावांचून नांवाजणे नसो मला जें मनोरम सर्वाहून तें अर्पितों मी त्याजला ३ पाहा, तें शिर, हात, पाय रे ! शोक, प्रेम गाळिती अपूर्व ओघ नव्हे काय? कांट्यांचें मोल, हो किती? ४ हें जग माझें असतें, होतें अर्पाया तें लहान ही दिव्य प्रीति मागते सर्वस्व, आत्मा, जीवदान ५ जो ख्रिस्त पाप्यांकरितां त्या क्रूसें कृपा मिळवी, तयाला त्रात स्तवितां वंदोत नित्य वैभवीं