तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं कुठें

मराठी

तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं कुठें विरह तुझा रे नरक भयंकर, भासे प्रलयानल पेटे धर्मरवी तूं क्षणभर नसतां, मम हृत्कोशी तम दाटे तुजवांचुनिया मार्ग जगीं ह्या, मज दिसती तितुके खोटे पापी खटनट मीं मज माझें, तुजविण भारी भय वाटे उलटें मन्मन तुजविण दुसरा, कोण जगीं ह्या करि सुलटे मम जीवन तूं जगदुद्धारा, मेलोसें तुजविण वाटे सहवासाहुन तुझ्या मला रे, स्वर्गाचें सुख नच मोठें