तुझी करावी सेवा

मराठी

१. तुझी करावी सेवा सदा माझा हेतू, स्वामी, सन्मित्रा, देवा, राहीं सान्निध्यीं तूं तूं माझीया सान्निध्यीं न मी युद्धा भीतों, नेणार तूं रक्षूनी मार्गभ्रांती न तों २ तूं नित्य माझ्यापाशीं, मला वाटो ऐसें हें सारें दूजें राही माझ्या ठायीं जसें! संमोहिती देखावे किती हे नेत्रांना! ह्या शब्दांनीं मांडीली कर्णावची वंचना ३ हे अंतरीं बाहेरीं उभे माझे वैरी त्राणा माझ्या, येई रे संरक्षीं, सांवरी ! आश्वासीलें तूं त्यांतें तुझ्या झालेल्यांतें कीं ‘मी सुस्थानीं जेथें माझे तेही तेथे ४ जीवंत आहें तों मीं करावें सेवेला सिद्धीला जावो हेतू देणारा तूं बला मित्रा गुरो, दातारा, प्रभो ख्रिस्ता, स्वामी, हे राजा, हे आधारा, संरक्षीं नेहमीं !