१ तुझीं कृपादानें फार

मराठी

१ तुझीं कृपादानें फार वर्षभर पावूनी येशू, मानितों आभार, त्रात्या ऐक, वरुनी २ बलदुर्गा तूं आश्रय हो आम्हांसीं संकटांत हो सन्मार्ग तूं अक्षय, मार्ग नाहीं या वनांत ३ यंदा मृत्युखिंडींतून जावें लागलें कोणांस, देवा, साह्य पाठवून पुरवी शांति तयांस ४ आम्हां राखी भक्‍तिमान, दूर करी अरिष्टांस टिकण्यास देइ त्राण, योग्य करी मुगुटास ५ तेव्हां मंदिरीं वरील तुला वर्णू सदोदित, कां तूं, प्रभो, क्षमाशील, सार्वभौम राजा नीत