१ तूं चाळीस रात्र दिन,

मराठी

१ तूं चाळीस रात्र दिन, रानीं केला उपवास राहुनीया पापहीन, दुष्ट मोह साहिलास २ दिवसा उन्हाचा त्रास, रात्रीं पडे दंव गार हिंस्त्र पशु आसपास, धोंडें-उशी, भुई-थार ३ भवसुखें सोडूनी आम्हीं कां न वाहूं भार ? उपवासें प्रार्थूनी संगें कां न राहूं फार ? ४ हल्ला करुनी सातान देहा, आत्म्या देतां त्रास, तूं त्यावरी जयवान, रक्षीं अढळ आम्हांस ५ तरी आम्हां देवाची शांति, हर्ष कळतील तुझी तैसी आमुची सेवा दूत करितील ६ अंतकालाच्या पास्खास मिळावें त्वत्सवें स्थळ, प्रिय तारका, आम्हांस रक्षीं नेहमी जवळ