१ तूं बोलाविलें सेवा कराया

मराठी

१ तूं बोलाविलें सेवा कराया प्रभू आलों आनंदें तरि विश्वासें तुजजवळीं मज नित्य राहूं दे ध्रु. मज जोडी, प्रभु तूजशीं तव क्रुसा दावोनी, मज घेई, तव कुशीशीं प्रभु, घेई ओढोनी २ तव सेवेला क्षम व्हावेंसें मज करीं कृपेनें, तव इच्छेला वश सर्वदा, स्थिर व्हावें आशेनें ३ क्षणभरीही तुजजवळी किती शांति मनाशी! किती मागणीं, प्रितीभाषणें जशीं मित्र मित्राशीं ४ तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकीं कळेना भरती तैशी सदानंदाची न मिळे स्वर्गाविणा