त्वत्पदछंद निरंतर राहो,

मराठी

त्वत्पदछंद निरंतर राहो, प्रेम मनांतुन वाहो तव इच्छा ती माझी व्हावी, हेंच मनाला भावो निंदो वंदो कोणी, मन हें प्रेमभरें तें साहो दो दिवसांची यात्रा येथील, दिव्यपदीं मन राहो प्रेम तुझ्यावर, प्रेम जगावर, हाच म्हणो मन लाहो तव वचनीं रति संतत राहो, मन येशूचें होवो सुचोत न मला हजार नावें, मन बापा तुज वाहो