१ त्वद्वचन देवा

मराठी

१ त्वद्वचन देवा भवी ज्ञानठेवा दीप भक्तां दावी सत्य मार्ग दावी २ शत्रु येतां भोतें धैर्य आम्हां देतें शांति देतें चित्ता कळवी सुवार्ता ३ संकटीं तें देतें प्रकाश आम्हांतें मार्गी रक्षी आम्हां नेई सौख्यधामा ४ भोळ्या भाविकातें ऐकोनी वाटे तें सुखाची कहाणी बहुमूल्य खाणी ५ जीवंतांच्या कानीं मधु शास्त्रवाणीं मरणोन्मुखातें साह्य स्वास्थता तें ६ आम्ही तें शिकावें शुद्ध ज्ञानी व्हावें राहाया आकाशीं प्रभो तुझ्यापाशीं