दिवस खरा हा विमलचि स्तवुं अति

मराठी

दिवस खरा हा विमलचि स्तवुं अति प्रभुवर अजि देव तो -ध्रु जगत्कर्ता देव पिता, अघहरण करी जो, गाउं तो मृत्युला जिंकीलें, मधु ईशसुत सुखदा ध्याउं तो आत्मन्‌ तीं नवदानें, अमित रुचिर देई, थोर तो अंतरिं ये प्रीति दे, सकल जनच तुजसी वर्णु तों निजरुप तूं मज दिधलें, मनिं भर तव प्रीति, प्रार्थितों मम तूं हो मी तव हो, मम हृदयच तुजला अर्पितों तुजसंगे मृत व्हावें, नित पुरलेल मी होऊं तों बलि व्हाया अविरत मी, बहु हर्षे उस्थित होऊं तों आत्म्या तूं पेट हृदीं, दे दानच कर मज प्रेम तो त्र्येका तूं मनि वस गा, मम व्हावें तूं, मी तेंवि तो