१ दिव्य तेजें प्रकाशीत स्थळ

मराठी

१ दिव्य तेजें प्रकाशीत स्थळ दिसे विश्वासनयनें वर, तेथें आम्हांसीं वस्ती अढळ प्रभु देईल, तो प्रियकर ध्रु. अहा! त्या सुस्थळीं, पार नाहींच हो विश्रामा, तेथेंही सुदिनीं भेट होई प्रियांची आम्हां २ तारिलेल्यांचीं तीं गायनें तेव्हां गाऊं मंजुळ स्वरें, नाहीं कोणाचें तैं रडणें दु:ख पीडा हें गेलें सारें ३ प्रभु ख्रिस्त अत्यंत प्रेमळ, सर्व सत्सुख जो पुरवी, जीवनाचा तो पाया सबळ त्यास वंदूं सदा गौरवीं