दीन पतित मी ये तव द्वारीं

मराठी

दीन पतित मी ये तव द्वारीं प्रसाद ध्याया तव मंदीरीं- ध्रु. पामर योग्य न दास गणाया समीप येण्या पात्र न सदया प्रेमळ परि प्रभु करुनी माया प्रणतवत्सला, घे बाळ करीं, श्रद्धा मम तव वचनावरती हजर इथें आम्हां सांगाती शरिर रुधिर तव वेदीवरती भावें सेविन मी प्रणतशिरीं तव वचनातें ध्यानिं धरावें हे मम स्मृतिस्तव नित्य करावें भोजन करितों भक्‍तीभावें चरणीं नत जन तूं स्वीकारी