दु:ख वाटते, रे प्रभू, दु:ख वाटते!

मराठी

दु:ख वाटते, रे प्रभू, दु:ख वाटते! सर्व पापे आठविता हृदय फाटते- ध्रु केली पापे पदोपदी गोड भासुनी ! होती दुर्गणांची धुंदी माझ्या नयनी काम, क्रोध, गर्व, यांनी होतो वेढिला ! दयानिधे तूच माझा पीळ काढिला दया, प्रीति, शांति काही नव्हती मना ! अशा सद्‍गुणांत होतो फार मी उणा तुझे रक्त मोलवान त्यात धूउनी ! मान पुण्यवान्‌ मला जवळ घेउनी खोड माझी सर्व पापे क्षमा करुनी आलो तुजकडे आता नम्र होउनी नको नरकी टाकू अशा कष्टि कोकरा वागवुनी घेई मला हे विश्वंभरा दासा होई मोठा हर्ष क्षमा पावता शांति बहु होई मनीं पापे हरता