दृष्टी लावूं काय पर्वताकडे मी,

मराठी

दृष्टी लावूं काय पर्वताकडे मी, कोठून तें येई साह्य माझें ? आकाश, पृथ्वीचा जो उत्पन्नकर्ता, तोच माझा त्राता साह्यकारी पाय तव नाहीं सरकूं देणार, तव राखणार निद्रा न घे इस्त्राएलां रक्षी तोही ना निजत, झोंपी नाहीं जात कधीं मुळीं ईश्वर रक्षण तव सत्य असे, तोच कीं विलसे सव्य करीं सव्य कराकडे तव परमेशा, छाया असे खास तव जाण दिवसास सूर्य रात्रीं चंद्र तूंतें, पीडणार ना ते कधीं काळीं अरिष्टापासून ईश्वर राखील, जीव संरक्षील सत्य तव आंत जाणें येणें बाहेर वसणें, रक्षील तो जाणे तुज देव