१ देवा! तूं साह्य आजवर

मराठी

१ देवा! तूं साह्य आजवर आशाही इत:पर वादळीं थारा निरंतर स्वर्गी शाश्वत घर २ तुझ्या सिंहासनासमोर भक्तांसि नसे भय, तुझेंची बाहुबल थोर रक्षी आम्हां अक्षय ३ नगादि सारे वस्तुजात नव्हतें जै निर्मित, होतासि तै तूं अस्तित्त्वांत आहेसी सदोदित ४ युगसहस्त्र तुजला एका दिनासमान जणों प्रहर एकला, रात्रीच्या अंतीं जाण ५ काळ हा लोंढ्यासारिखें नेई जनां लोटीत स्वप्नवत् स्मृतिपारिखें करी त्यांचे जीवित ६ देवा, तू साह्य आजवर, आशाही इत:पर आधार हो तू जन्मभर, स्वर्गी शाश्वत घर,