ध्रु. देवाची सत्प्रीती किती महनीय

मराठी

ध्रु. देवाची सत्प्रीती किती महनीय गगनी तारे, पर्वत, समुद्र सर्वात महनीय (२) १. अगम्य आनंदे हे भरले प्रभूचे कार्य जगी बघून मन रमले निशिदिनी प्रभूस्तुतीस योग्य (२) ख्रिस्तवंदन मधुर (२) २. संकटसमयी हे जिने निरस वाटे विनवी देवाला कंठ भारी दाटे उत्तर देई प्रार्थनेच्या आधी (२) म्हणे मी तुजसंगती (२) ३. अंधारी दरीतुनी वाट भयंकर मृत्यू, भय, पाश, दु:खाचे सागर मेषपालासम चालावी मजला (२) नाच सोडी मजला (२) ४. उणे पडेल काय? याचे भय नुरले प्रशस्त कुरणात निर्भय बसविले तृप्त करोनी भोजनजले (२) अवघे पुरविले (२) ५. देवाच्या मंदिरी स्तुती सदा करीन संपूर्ण हृदयाने स्तवन मी करीन स्तुतीस योग्य आहे दयाधन (२) हलेलुया आमेन (२)