१ देवें शब्बाथ योजीला,

मराठी

१ देवें शब्बाथ योजीला, हा माझा, तो गणी या, संतांनो, या, दूतांनो, उल्हासा गायनीं २ या दिनीं ख्रिस्त उठूनी जिंकीता जाहला, या, संतांनो, या दूतांनो वर्णा प्रभावाला ३ होसान्ना गा येशूराया, त्या देवनंदना, प्रभू येई, त्राता येई, त्राणा आणी जना ४ धन्य प्रभु, जो येवोनी कृपा दावी नतीं पित्याच्या ईशाच्या नामें लोकीं साधी मुक्‍ती ५ होसान्ना गा येशु राजा, संतांनो, भूतलीं स्वर्गी गाती उच्चस्वरें दूतांची मंडळी