द्या जलासि, द्या जला,

मराठी

द्या जलासि, द्या जला, लागली तृषा मला क्रूसावर आर्तस्वर ख्रिस्त शब्द बोलला- ध्रु जीवनौघ तूं; स्वतांचि उदक पान मागसी ? अज्ञ नरें वेत्रकरें आंब दीधली तुला उदकतृषा परमेशा, तुला कशी लागणार ? जन असंख्य जेवविशी, चमत्कार ऐकिला ही तहान बहिर्प्राण नसे, जाणतों खरें अंतरिंची तळमळची, शांतवूं कसा हिला ? उदक असो, असो सुधा, तृषा हरण ना करी करूं काय ? वद उपाय तुज विनंति प्रेमला भार अघाचा मदर्थ तूं स्वतांचि वाहसी जगत्तारणार्थ मुदें दु:खभोग साहिला जगत्तारणाची तुज लागली असे तृषा रुधिर मोल देउनिया तूं उपाय साधिला वर्तमान हें जगास कळो, ही तृषा तुझी भागविणें शिष्यगणें समाधान हें तुला काय करुं मज न सुचे, तरी देत, घेत प्रभो मम हृदया, योजि तया, पूर्तवी स्वहेतुला