धन्य धन्य ! ख्रिस्त जगत्पति विराजतो

मराठी

धन्य धन्य ! ख्रिस्त जगत्पति विराजतो आज तसा पुढें सदा राजराज तो- ध्रु गिरिनद ह्या सार्वभौम भूपतीप्रती वनिति, निधि विजयशब्द नित्य गर्जती पंगु, दीन, पूर्ण सबल ख्रिस्तसंगती अघजनिता दरिकुहरीं तोंड लपवितो प्रीतिसुधावृष्टिपुष्ट भूप्रदेश तो निर्मलत्ववायु मंद मंद वाहतो भावसूर्य नित्य तमा दूर सारितो संधि दिसे, कलह नसे, हर्ष वाटतो मृत्युदरी सुगम विगतभीति जाहली ऋद्धिसिद्धि जोडुन कर सिद्ध राहिली स्वर्ग, धरा एकरुपतेस पावली जय जय प्रभु येशू ख्रिस्त विश्वपाल तो