धन्य प्रभु तुझें नाम

मराठी

धन्य प्रभु तुझें नाम तुज करीतों प्रणाम दिली निद्रा सुखाची ती उठविलें सुप्रभातीं येता हा नूतन दिन करी स्वत:स अर्पण तूं हो कर्ताकरविता चालवी धरुन हातां कायावाचामनें देवा माहिमा नामाचा व्हावा ऐक माउली प्रार्थना बाळ करीतें याचना आशिर्वाद दे दयाळा सन्मार्गी चालवीं बाळां